आवृत्ती , पुणे

अंमली पदार्थ विरोधी पथकाने ३० लाखांचा गांजा, अफू, मेफेड्रॉन केला जप्त

दोन दिवसांत कोंढवा, बिबवेवाडी, आंबेगावात मोठ्या कारवाया : ४ जणांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ‘ड्रग्जमुक्त पुणे’ मोहिमेत पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी आणि रविवारी कोंढवा, बिबवेवाडी आणि आंबेगाव येथे केलेल्या तीन कारवायांमध्ये चौघांना अटक करून तब्बल ३० लाख ६७ हजार रुपयांचा गांजा, अफू आणि मेफेड्रॉन असा अंमली … Read more

पैशांसाठी ४० दिवसांच्या मुलीला आईवडिलांनीच विकले

विकत घेणारी महिला, आईवडील, मध्यस्थांसह ६ जणांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुलं न होणाऱ्या महिलांना समाजात मानाचं स्थान मिळत नाही. त्यातूनच त्या मुलासाठी कोणत्याही थराला जात असतात. पैसे देऊन ४० दिवसांची मुलगी विकत घेणाऱ्या महिलेला आता त्यामुळे अडचणीत यावं लागलं आहे. पोलिसांनी या महिलेसह, मुलीचे आईवडील आणि मध्यस्थ अशा ६ जणांना अटक केली … Read more

सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तुल, जिवंत काडतुसे जप्त

वारजे पोलिसांची कामगिरी : खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा होता दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून वारजे पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस, असा एकूण ४० हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे. सागर अनिल मुंडे (वय २१, रा. शिवशक्तिनगर, सुतारदरा, कोथरूड) असे या सराईत … Read more

औंध भागात दहशत माजवणाऱ्या ७ गुंडांना केली जेरबंद

चतु:श्रृंगी पोलिसांची कामगिरी : गावठी कट्टा, ३ कोयते, कार व २ मोटारसायकली जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : औंध येथील विधाते वस्तीत १२ ते १५ आरोपींनी हातात लाकडी दांडके व हत्यारे घेऊन दहशत निर्माण केली होती. चतु:श्रृंगी पोलिसांनी मुळशी भागातून ७ गुंडांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, तीन कोयते, एक कार आणि दोन … Read more

आषाढी वारी आणि मोहरम एकाच दिवशी : बार्शी शहरात कडक बंदोबस्त

पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांचे नागरिकांना सलोख्याचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बार्शी शहरात येत्या ६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशी आणि मोहरम हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे होणार आहेत. आषाढी एकादशीनिमित्त भगवंत मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. हे मंदिर बार्शीतील वारकरी परंपरेचे महत्त्वाचे केंद्र असून, आषाढी एकादशीच्या दिवशी येथे … Read more

पीएसआयच मद्यप्राशन करून करत होता ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह कारवाई

दारुच्या नशेत ठेकेदाराशी हुज्जत घालणारा पीएसआयला केले निलंबित महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मद्यप्राशन करून गाडी चालवून अपघाताला कारणीभूत होऊ नये, यासाठी पोलीस दलाकडून नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली जाते. पण, एखादा श्रेणी पोलीस उपनिरीक्षकच दारूच्या नशेत ‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’ची तपासणी करताना वाहनचालकाशी हुज्जत घालत असेल, तर? अशाच प्रकारामुळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस उपायुक्त हिम्मत … Read more

एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

ज्येष्ठांबरोबर एटीएम कार्ड अ‍ॅक्टिव्हेट करण्याच्या नावाखाली तरुणाला घातला गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या नावाखाली हातचलाखीने कार्ड बदलून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचवेळी एटीएम कार्ड अ‍ॅक्टिव्हेट करून देण्याच्या नावाखाली चोरट्याने एका तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वाघोली येथील एका ३१ वर्षीय तरुणाने विश्रामबाग पोलीस … Read more

अमृत २ पाणीपुरवठा योजनेच्या समर्थनार्थ भूममध्ये मोर्चा

संजय गाढवेंनी दिली मीटरमुक्तीची ग्वाही महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या अमृत-२ पाणीपुरवठा योजनेच्या समर्थनार्थ गुरुवारी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या नेतृत्वाखाली शहरात मोर्चा काढण्यात आला. यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी गाढवे यांनी मीटरमुक्तीची आणि वाढीव नळपट्टी न आकारण्याची ग्वाही उपस्थितांना दिली. योजनेची शहराला गरज असल्याने, पाणी कृती समिती आणि … Read more

जोधपूरवरून अंमली पदार्थ आणून कोंढव्यात विक्री

गॅस वितरकाकडे काम करणाऱ्या तरुणाकडून १३ लाखांचे मॅफेड्रॉन जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढव्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तरुणाला पकडून त्याच्याकडून १३ लाख ६० हजार रुपयांचे ६७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त केले आहे. सुनिल बिश्नाराम चौधरी (वय २०, रा. खडी मशीन चौक, कोंढवा) असे या तरुणाचे नाव आहे. सुनिल चौधरी … Read more