आवृत्ती पुणे

गोव्यातील ‘आयर्नमॅन 70.3’ मध्ये बार्शीचा चार खेळाडूंचा ऐतिहासिक विजय

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : गोव्यात आयोजित आंतरराष्ट्रीय ‘आयर्नमॅन 70.3’ ट्रायथलॉन स्पर्धेत बार्शीतील चार खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत ‘हाफ आयर्नमॅन’ हा मानाचा किताब मिळवला. माणिक हजारे, अमोल ताकभाते, प्रकाश फुरडे आणि डॉ. नवदीप लोकरे यांनी निर्धारित वेळेच्या आत ७०.३ मैलांचे अंतर पार करत हा बहुमान प्राप्त केला. ‘आयर्नमॅन’ ही जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या स्पर्धांपैकी … Read more

भूम नगरपरिषद निवडणूकित दोन्ही आघाड्यांकडून उमेदवारी अर्जांचा वर्षाव

छाननीत तीन अर्ज रद्द : नगराध्यक्ष पदासाठी ९ तर नगरसेवक पदासाठी ८१ अर्ज कायम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा उत्साह चरमसीमेवर पोहोचला असून अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही प्रमुख आघाड्यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे आगामी निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. भूम नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी एकूण नऊ … Read more

कश्मीर–कन्याकुमारी सायकल रॅलीत हवालदार अमृत खेडकरांची ऐतिहासिक कामगिरी

4250 किमी प्रवास 16 दिवसांत पूर्ण : सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील पहिले यश महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : हवालदार अमृत रोहिदास खेडकर यांनी भारत सरकारच्या युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स मंत्रालय, फिट इंडिया मूव्हमेंट आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित कश्मीर ते कन्याकुमारी (4250 किमी) सायकल रॅली यशस्वीरीत्या पूर्ण करत सोलापूर ग्रामीण पोलिस … Read more

सिंहगड कॉलेज कॅम्पसमधील फ्लॅटमध्ये हुक्का पार्लर

फ्लॅटसह एका हॉटेलवर भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरातील एका फ्लॅटमध्ये हुक्का पार्लर चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या फ्लॅटसह तेथील ‘रूट २४’ हॉटेलमधील हुक्का पार्लरवर भारती विद्यापीठ पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी सौरभ प्रकाश फडके (वय २७, रा. आसावरी कुंज अपार्टमेंट, नवले पूलजवळ, … Read more

उत्तरेकडील थंडीचा प्रकोप वाढला

महाराष्ट्रात तापमानात मोठी घट : जेऊर ७°, पुणे ९.४° महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा दबाव वाढल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह मध्य भारतात गारठा जाणवत आहे. राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली असून मंगळवारी सकाळी जेऊर येथे ७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुण्यात ९.४ अंश, तर हवेली (कदम वाक वस्ती) येथे तब्बल ६.९ … Read more

भूममध्ये दोन्ही आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल

नगराध्यक्ष पदासाठी ९ : नगरसेवक पदासाठी ८४ अर्ज दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी (ता. १७) दोन्ही प्रमुख आघाड्यांकडून मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी एकूण नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून नगरसेवक पदासाठी तब्बल ८४ उमेदवारांनी अर्ज सादर केले. आलमप्रभू शहर विकास … Read more

सराईत गुन्हेगारांकडून ४ गावठी पिस्तूल, ५ जिवंत काडतुसे जप्त

काळेपडळ पोलिसांची कामगिरी : विरोधी टोळीच्या हल्ल्याच्या भीतीने बाळगली शस्त्रे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विरोधी टोळीतील गुंड बदला घेण्यासाठी हल्ला करतील या भीतीने मध्य प्रदेशातून शस्त्रे आणून ती बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारासह तिघांना काळेपडळ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ४२ हजार रुपये किंमतीची ४ पिस्तुले आणि ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आशिफ … Read more

सूर्यदत्त संस्थेला GHRDC कडून उच्च श्रेणीचे मानांकन

देशातील टॉप ‘A’ कॅटेगरी बी-स्कूल्समध्ये सूर्यदत्तचा समावेश: सलग २५ वर्षे मानांकनाचा बहुमान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटने प्रतिष्ठित GHRDC रँकिंग 2025 मध्ये देशातील टॉप पंधरा ‘A’ कॅटेगरी बी-स्कूल्समध्ये स्थान पटकावत पुन्हा एकदा अभिमानाची कामगिरी साधली आहे. सलग पंचवीस वर्षे मिळालेला हा मानांकनाचा बहुमान सूर्यदत्तच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि नवोन्मेषी दृष्टीकोनाची साक्ष देतो. … Read more

पीएमपी प्रवासी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला अटक

ब्लेडने वार करून पळून जाण्याचा प्रयत्न : प्रवाशांनी दिले फरासखाना पोलिसांकडे पकडून महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे मनपा ते दगडूशेठ हलवाई गणपती दरम्यान पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र कटरने कापून चोरण्याचा प्रयत्न फसला. त्या वेळी आरोपी महिलेनं ब्लेडने वार करून चालत्या बसमधून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र बसमधील प्रवाशांनी तिला पकडून … Read more

जिल्हा परिषद शाळेत मोफत व दर्जेदार शिक्षण : प्रा. महावीर जालन

पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर : मोफत वह्या-पुस्तके व गणवेशामुळे शिक्षण सुलभ महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोकेवाडी (ता.भूम) येथे पालक मेळावा शनिवारी (ता.१५) रोजी सकाळी १० वाजता संपन्न झाला. या पालक मेळाव्यास संबोधित करताना प्रा. महावीर जालन म्हणाले की, गावोगावच्या जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत , याच जिल्हा परिषद … Read more